आज आपण सदर लेखातून वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल व अद्याप HSRP बसवलेले नसेल तर 15 ऑगस्ट 2025 ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या तारखेपर्यंत HSRP बसवणे सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. जर असे केले नाही तर कारवाई होण्याची शक्यता आहे.
HSRP म्हणजे काय?-
HSRP ही विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी रोखण्यासाठी, वाहन ओळख सुनिश्चित करण्यासाठी व वाहतूक नियंत्रण सुलभ करण्यासाठी वापरण्यात येते. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही ॲल्युमिनियमपासून बनवली जाते. तिचा आकार 1.1 मिमी एवढा असतो. तिच्यावर एक होलोग्राम जोडण्यात आला आहे व तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशीलाची ऑनलाईन नोंदणी होते. सुरक्षिततेसाठी प्लेटवर एक युनिक लेझर क्रमांक छापला जातो. विशेष म्हणजे ही प्लेट वेगळ्या बनावटी पद्धतीने बनवणे अशक्य आहे. या प्लेटवरील क्रमांक ‘जीपीएस’शी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या स्थिती वाहन कोठे आहे याची माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे.
हे लक्षात असू द्या-
अर्ज करत असताना RC बुक व वाहनाचे तपशील हाताशी ठेवावे. दिलेल्या वेळेतच नंबर प्लेट बसवावी नाहीतर दंड अथवा कारवाई होऊ शकते. बनावट वेबसाईटपासून सावधान राहावे व नेहमी अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.