आता अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती.
अनेक शेतकरी सध्या फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी अॅग्रिस्टॅक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी शासनाने अॅग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व …