तुमच्या गावांमध्ये कोणाकोणाला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये मिळतात? फक्त एका क्लिकवर पहा.

राज्यामधील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र शासनाच्या मार्फत हा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. परंतु हा हप्ता मिळण्याअगोदरच प्रत्येक लाभार्थ्याने आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

पीएम किसान योजना म्हणजे काय?-

पीएम किसान सन्माननिधी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शेतीच्या वाढत्या खर्चात ही मदत अनेक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरते.

22 व्या हप्त्या बाबत शेतकऱ्यांची प्रतिक्षा?-

योजनेच्या 22 व्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तरी लवकरच हा हप्ता जमा होणार आहे, असे संकेत दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती तपासून ठेवणे गरजेचे आहे.

गावनिहाय लाभार्थी यादी कशी पहावी?-

  • शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील लाभार्थी यादी सहजपणे ऑनलाईन पाहता येते. त्यासाठी सर्वात अगोदर pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे.
  • होमपेजवर “लाभार्थी यादी” (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता पुढे राज्य, जिल्हा, तालुका ब्लॉक व गाव निवडायचे आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, “रिपोर्ट मिळवा” या पर्यायावरती क्लिक करावे.
  • तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसणार आहे.

लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून का वगळण्यात आली?-

मागील काही महिन्यांमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यादीचे पुनरावलोकन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आलेली आहेत. या मागची अनेक कारणे समोर आलेली आहेत.

नियमांचे उल्लंघन ठरले कारणीभूत-

  • एका कुटुंबातील पती व पत्नी दोघेही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेत असल्याचे अनेक प्रकार आढळून आले.
  • नियमानुसार एका कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत.
  • त्याचबरोबर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या नावावर हप्ते जमा होत असल्याचे आढळून आले, हेही नियमबाह्य ठरले.

ई- केवायसी अपूर्ण असल्याची अडचण-

मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्यापिक केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. आधार क्रमांक, बँक खाते व जमिनीच्या नोंदी यामध्ये तफावत असल्यास लाभ थांबण्यात आलेला आहे. यामुळे अनेक शेतकरी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

हप्ता मिळवण्यासाठी काय करावे?-

22 वा हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही, बँक खाते आधारशी जोडलेले आहे की नाही व आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही याची तातडीने खात्री करून घ्यावी. आवश्यक दुरुस्त्या वेळेत केल्यास पुढील हप्त्याचा लाभ निश्चितपणे मिळू शकतो.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *