आज आपण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुमची केवायसी करत असताना चुकली असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. शासनाने ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे व ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणी आता दुरुस्त करू शकतात. त्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी जीआर देखील काढण्यात आलेला आहे. GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर ई-केवायसी दुरुस्ती नक्की कशी करायची हे सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
ई-केवायसी दुरुस्त करण्याची पद्धत-
- सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- तेथे एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे “ही ekyc ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ekyc करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते” या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे.
- आता पुढे लाभार्थी आधार क्रमांक व कॅपच्या भरून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन ‘ओटीपी पाठवा’ या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आता आलेला ओटीपी टाकून ‘सबमिट करा’ या बटनावरती क्लिक करायचे आहे. जर ओटीपी आला नाही तर तुम्हाला ही ई-केवायसी प्रक्रिया करण्याची गरज नाही. परंतु ज्यांचा ओटीपी येत आहे त्यांना ही केवायसी दुरुस्त करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
- आता पुढे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत A आणि B त्यातील A आणि B या दोन्ही पर्यायांमध्ये “नाही” असे सिलेक्ट करायचे आहे व खाली देण्यात आलेल्या बॉक्सवरती टिक करून ‘सबमिट करा’ या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे आपण आपली ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

