राज्य शासनाची महत्त्वकांशी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनाने शुक्रवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी एक जीआर काढलेला आहे. त्यानुसार आता लाडकी बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेले आहे. मागच्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत आदेश काढून पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता 31 मार्चपर्यंत ई केवायसी करता येणार आहे.
शासन परिपत्रकात नेमके काय म्हटले आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे; परंतु ही प्रक्रिया करत असताना नजर चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ई- केवायसी करता येणार आहे. योजनेच्या पोर्टलवर तशी सुधारणा करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असे शासनाने म्हटले आहे.
नेमका चुकीचा पर्याय कोणता?-
31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडताना- लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार अथवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही. नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता.
त्यामुळे शासनाने पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्याचा अवधी उपलब्ध करून दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव प्र. वि. कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे व पोर्टलमध्ये बदल केल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे शासनाने आवाहन केलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

