लाडक्या बहिणींना “हा” असा मेसेज येत असेल तर याचा नेमका अर्थ काय?

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत परिपत्रक काढून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु, अनेकांना ई- केवायसी करताना “हा आधार क्रमांक ekyc दुरुस्तीच्या यादीत नाही, असा मेसेज येत आहे. त्यामुळे महिलांच्या मना चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा नेमका अर्थ काय आहे? चला तर मग सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांची ई-केवायसी रखडलेली आहे. त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांनी अगोदर केवायसी केलेली आहे किंवा चुकीची माहिती भरलेली आहे त्यांनाच फक्त ही ekyc करावी लागणार आहे. त्यामुळे “हा आधार क्रमांक ekyc दुरुस्तीच्या यादीत नाही” असा मेसेज जर येत असेल तर तुमची ekyc आधीच पूर्ण झालेली आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत महिलांना चिंता करू नये. ज्यांनी योग्य माहिती दिलेली आहे, त्यांना परत ekyc करण्याची गरज नाही. त्यासाठी कोणाला पैसे देण्याचीही गरज नाही.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेले आहे. मागच्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केलेले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे व आता त्यांना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *