देशातील सर्वात मजबूत व गतिशील अर्थव्यवस्थांपैकी राज्यातील अर्थव्यवस्था ही एक आहे. चालू आर्थिक वर्षात ती 7.9 टक्क्यांनी वाढलेले आहे, असा अंदाज 2025-26 च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलेला आहे. कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक व व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालामध्ये नमूद केले गेलेले आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करत आहेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
यासोबत राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा संकल्प तसेच समितीच्या शिफारसीनुसार उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांशी अशा कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणारा आहे. या योजनेचे नामकरण आता “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” असे करण्यात आलेले आहे.
कर्जमाफीचा कोणाला कसा मिळणार फायदा-
- ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.
- जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर व नियमित भरत होते अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
- या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे व त्याचबरोबर शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळवण्यास याची मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

