Pm Ujjwala योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी कोणाला मिळणार?

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना वार्षिक नऊ सिलेंडर पर्यंत 14.2 किलोच्या सिलेंडरवरती 300 रुपयांपर्यंतची सबसिडी देण्यात येते. परंतु ही सबसिडी बंद होऊ नये म्हणून पुन्हा एकदा सर्वच गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे. देशभरामध्ये जवळपास 10 कोटी 55 लाख पेक्षा जास्त लाभार्थी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रमध्ये जवळपास 55 लाखापेक्षा अधिक लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी आहेत.

संबंधित लाभार्थ्यांना वर्षातून एकदाच ई-केवायसी करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अनेक महिला लाभार्थ्यांना गॅस एजन्सीच्या माध्यमातून इण्डेन, भारत, एचपी या एजन्सीकडून केवायसी करण्यासाठी कॉल करण्यात येत आहेत. परंतु महिला लाभार्थी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी झाली नाही तर अशा लाभार्थ्यांची सबसिडी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही केवायसी तुम्ही घरबसल्या देखील करू शकता?-

  • यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा पोर्टलवर जाऊन तुम्ही वापरत असलेल्या इण्डेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस यापैकी एका गॅसचे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला केवायसी करता येणार आहे.
  • किंवा तुम्ही थेट त्या संबंधित पोर्टलच्या माध्यमातून देखील  केवायसी करू शकता.
  • किंवा आपल्या गॅस डिस्ट्रीब्यूटरकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील ही केवायसी पूर्ण करू शकता.
  • त्यामुळे या मार्च महिन्यातील 31 तारखेपर्यंत तुम्ही ही केवायसी पूर्ण करू शकणार आहात.
  • नाहीतर तुम्हाला मिळणारी जी सबसिडी आहे ती बंद होणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *