देशभरातील रेशनमध्ये 1 एप्रिलनंतर होणार ‘हा’ मोठा बदल?

केंद्र शासनाच्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेला मोठे बळ आता मिळणार आहे. एप्रिलपासून पोर्टेबिलिटीवर धान्य घेण्यासाठी असलेले रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे. पुरवठा विभागाने यासाठी मंजुरी दिलेली आहे व केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेला मोठे बळ यामुळे मिळणार आहे. पोर्टेबिलिटीवरती धान्य घेण्यासाठी  असलेल्या रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटवण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध होणार आहे. पुरवठा विभागाने यासाठी मंजुरी दिलेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार सर्व कार्डधारकांना अनुदानित रेशन धान्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अन्न वितरण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. रेशन धान्याच्या पोर्टिबिलिटीसाठी अतिरिक्त 10 ते 15 टक्के धान्य कोटा उपलब्ध करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत होती. त्यानुसार आमची मागणी शासनाकडून मान्य झालेली आहे व एप्रिलपासून आता मागेल तितका धान्य कोटा वाढून मिळणार आहे.

आता कुठल्याही रेशन दुकानात धान्य मिळणार –

  • शासनाच्या पोर्टेबिलिटी सुविधेमुळे ग्राहकांना स्वस्त धान्य दुकान बदलण्याचे स्वतंत्र मिळणार आहे.
  • रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
  • आता कुठल्याही भागातील रेशन कार्डधारकांना कोणत्याही भागातील रेशन दुकानामधून धान्य घेता येणार आहे व त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे.
  • ग्राहकांना दुकान बदलण्याचे स्वतंत्र असणार आहे.

आधी काय अडचण होती?-

  • रेशन कार्ड विशिष्ट दुकानांशी संलग्न असल्यामुळे दुसरीकडे राहणाऱ्यांना धान्य घेणे कठीण जात होते.
  • पोर्टेबिलिटीसाठी स्वतंत्र कोटा नसल्याने मर्यादा होती.
  • स्थलांतरित कुटुंबांची गैरसोय यामुळे होत होती.

आता काय बदलणार-

  • 1 एप्रिलपासून पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त धान्य मिळणार आहे.
  • दुकानदारांना मागणीनुसार कोटा मंजूर करून देण्यात येणार आहे.
  • कोणत्याही राज्यात धान्य उपलब्ध होणार आहे.

लाभार्थ्यांना दिलासा-

  • नवीन निर्णयामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य मिळणार आहे.
  • त्यामुळे कोणत्याही शहरातील किंवा राज्यातील कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
  • ‘वन नेशन, वन रेशन’ संकल्पना परिणामकारक ठरणार असून लाभार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *