मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका कुशंकांच्या पार्श्वभूमीवरती या अर्थसंकल्पांमध्ये मुख्यमंत्री या योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे राज्यातील महिला वर्गाचे सर्वाधिक लक्ष लागलेले होते. दरम्यान या अर्थसंकल्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला वर्गाला मोठा दिलासा देणारी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत माहिती देताना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अशी सुरू राहणार आहे.
तसेच या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट स्पष्ट केले आहे. परंतु या योजनेमधून महिलांना मिळणाऱ्या लाभामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्याची घोषणा मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. या योजनेच्या माध्यमातून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा तान पडत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या योजनेचे हप्ते अनेकदा लांबणीवर जात होते. त्या पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत वारंवार अनेक तर्क लावण्यात येत होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पामधून केलेल्या घोषणामुळे ही योजना यापुढे सुरू राहणार आहे असे निश्चित झालेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

