आज आपण सदर लेखातून पालक व विद्यार्थ्यांना महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. RTE च्या माध्यमातून दुर्बल घटकातील 25% जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. आता दुर्बल घटकातील 25% आरक्षित जागांसाठी 18 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (C) (1) नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.
या अंतर्गत पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधी सुरू होती. परंतु आता त्याची मुदतवाढ 18 मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर RTE अंतर्गत खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या घरापासून एक किलोमीटर अंतरातील शाळांपुरतीच मर्यादा उच्च न्यायालयाने स्थगित केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अटीवर आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारला सुद्धा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

