भरपूर दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. शासनाने पुढील हप्त्यासाठी निधी वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. या संबंधित शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. दोनच दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा बाविसावा हप्ता पीएम मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्माननिधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर याबाबत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1 हजार 774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हा हप्ता देखील वितरित होईल अशी शक्यता आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, सहावा हप्ता तसेच सातवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आठवा हप्ता वितरणासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

