लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागले होते. या महिलांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे. फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी 2026 चा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी अखेर उपलब्ध करून दिलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंगळवारी (ता. 24) रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 277 कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे.

पैसे कधी जमा होणार?-

सरकारी नियमांनुसार सरकारी तिजोरीतून निधी मंजूर झाल्याच्या नंतर पुढील आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचा रखडलेला 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडून लवकरच हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा व हप्ता मिळवा-

ज्या पात्र महिलांचे पैसे फक्त तांत्रिक कारणामुळे किंवा ई- केवायसी अपूर्ण असल्यामुळे रखडलेले आहेत, त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीच्या अगोदरच ज्या महिला आपली ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्यांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरलेले आहेत, त्यांना या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहे त्यांनी तात्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी संबंधित योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच स्थानिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती तपासावी असे सरकारने आवाहन केलेले आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *