अखेर रॉकेल वाटपाचा जीआर आला?

महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही वर्षापासून प्रधानमंत्री उज्वला योजना व इतर योजनांद्वारे एलपीजी गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले आहेत. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण करण्याबाबत माध्यमिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात रॉकेलचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात येत होते. परंतु सध्यास्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यास 3744 कि. ली. एवढे नियतन मंजूर केलेले आहे. त्या अनुषंगाने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पुढील आदेश देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्राचे केरोसीन (रॉकेल) वाटप-

  • एकूण वाटपकेंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास 3,744 किलो लिटर (37,44,000 लिटर) रॉकेल वाटप केले आहे.
  • प्रति लाभार्थी प्रतिकुटुंब/ प्रतिशिधापत्रिका 3 लिटर रॉकेल अनुज्ञेय राहणार आहे.

कुणाला मिळणार रॉकेल-

  • AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरणा प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • रॉकेल विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून रॉकेल उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील रॉकेल मिळवण्यास पात्र असणार आहेत.
  • त्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, असे कुटुंब देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहणार आहेत. (ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.)
  • स्थलांतरीत मजूर देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहणार आहेत. (केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य करण्यात येणार आहे.)

वितरण कालावधी-

  • रॉकेल वितरण मार्च 2026 मध्ये करण्यात येणार आहे.
  • वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
  • न उचललेल्या रॉकेलचे पुढे हस्तांतरण केले जाणार नाही.

कोणत्या जिल्ह्यात किती रॉकेल पुरवठा होणार यासंदर्भाचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *