आज आपण लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले असतानाच आता पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. कालपासून महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. सोशल मीडियावरती पोस्ट करत त्यांनी सांगितले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले आहे की, “महायुती सरकारचा दृढ निश्चिय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे पुढे सुरू राहील, असा माझा विश्वास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 227 कोटी रुपयांचा निधीला मान्यता दिली आहे. हा निधी महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे. महायुती सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकी अगोदर ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातात. महिलांना जानेवारीपर्यंतचे पैसे देण्यात आलेले आहेत, आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

