ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांमार्फत (सेवा सहकारी संस्था) वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम सुट्टीच्या दिवशी देखील युद्धपातळीवर सुरू आहे, यासाठी फक्त तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. दि.15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बँक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांना पोर्टलवर अपलोड करून शासनास पाठवावी लागणार आहे. बँक खात्याला आधार कार्ड न जोडणे, फार्मर आयडी न घेणे अशा कारणामुळे थकबाकीदार यादीतील अनेक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करणे बाकी आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खायातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू करण्यात आलेली आहे. आता या योजनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत, या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी दि.8 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु फक्त 40 टक्केच काम झाले त्यामुळे दि.15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढून देण्यात आलेली आहे. तरीदेखील अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करणे बाकी आहे.
राष्ट्रीयकृत बँकाचे आवाहन-
जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेले नाही .अशा शेतकऱ्यांकडून कर्जाची माहिती मागविण्यात आलेली आहे, माहिती सादर करण्याची आवाहन बँकांकडून करण्यात आलेले आहे.
ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी आधार कार्ड, फार्मर आयडी याची माहिती सहकारी संस्था, बँक शाखेला दिलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही माहिती द्यावी. तेव्हाच या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती अपलोड करून शासनात पाठवता येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरंबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

