एसटी प्रवाशांना प्रवास सवलत NCMC कार्ड असल्याशिवाय मिळणार नाही?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. आता एसटी बस प्रवासाच्या विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड(NCMC) अनिवार्य करण्यात आलेले आहे. या निर्णयाच्या अधिकृत घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे.

डिजिटल युगाची सुरुवात-

एसटी महामंडळाने रोख व्यवहारांना पूर्णपणे संपवण्यासाठी व सवलतीच्या वितरणात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी ही NCMC प्रणाली लागू केलेली आहे. हे फक्त तांत्रिक बदल नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल आधार देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. या कार्डमुळे सवलतीची अचूक नोंद होणार आहे, सुट्ट्या पैशांची कटकट संपणार व प्रवास अधिक स्मार्ट व सोयस्कर होणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड व NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केलेला आहे. राज्यभर लवकरच नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. बस स्थानकांवरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

कोणाला मिळेल NCMC कार्डचा लाभ-

ही योजना समाजातील विविध घटकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे.

  • विद्यार्थी- शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी लिंक केलेले कार्ड देण्यात येणार आहे.
  • ज्येष्ठ नागरिक व महिला- अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना अंतर्गत प्रवास करणाऱ्यांना आधार संलग्न कार्ड दिले जाणार आहे.
  • दिव्यांग- UDID क्रमांकाशी संलग्न विशेष कार्ड
  • पुरस्कारार्थी व पत्रकार- स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत कार्ड देण्यात येणार आहे.

कार्डची किंमत व रिचार्ज सुविधा-

  • नवीन कार्डची किंमत- 199 रुपये(GST सह) असणार आहे.
  • जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास- फक्त 149 रुपयांत नवीन कार्ड देण्यात येणार आहे.
  • वॉलेट मर्यादा- किमान 100 रुपये शिल्लक असणे गरजेचे; 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज.

रिचार्ज कोठे कराल?-

कंडक्टरच्या ईटीआयएम मशीनवर, अधिकृत वेबसाईटवर/ मोबाईल ॲपवर किंवा नियुक्त एजंटकडून. ही योजना एसटीच्या लालपरी प्रवासाला पूर्णपणे कॅशलेस व डिजिटल बनवण्याच्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. प्रवासी लवकरच या स्मार्ट कार्डचा लाभ घेऊ शकतील. ज्यामुळे प्रवास अधिक सुरळीत व पारदर्शक होणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *