राज्यातील पशुपालकांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय?

पशुपालन व्यवसायाला “कृषी समकक्ष दर्जा” लागू करण्यात आलेला आहे. किसान क्रेडिट कार्डधारकांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँका यांच्यामार्फत पशुपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरती 4 टक्के व्याजदर सवलत देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर योजनेची पात्रता-

  • प्रकल्प धारकाने केंद्र/राज्य शासन/ जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर नोंदणी गरजेची आहे.
  • व्याज परतावा सवलत पुढीलप्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुज्ञेय राहणार आहे.
  1. 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी/ 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी
  2. 45 हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट
  3. 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा
  4. 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी /शेळी गोठा
  5. 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह
  • पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे गरजेचे राहणार आहे.
  • सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यास बंधनकारक असणार आहे.

4 टक्के व्याजदर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक/ सहाय्यक निबंधक यांच्याशी समन्वय साधून, जिल्ह्यातील पशुपालकांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) संबंधित जिल्हा हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

पशुपालकांना देण्यात येणाऱ्या व्याज परतावा सवलत देण्याकरता निधी उपलब्ध करून देण्याची व त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही सहकार विभाग करणार आहे. या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेल्या कर्जास लागू राहणार आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *