बांधकाम नकाशा परवानगी(NA) म्हणजे काय? ती कशी व कोठे मिळते?

महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार आता बिगर शेती(NA) परवानगीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हात आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग ही बांधकाम नकाशा परवानगी कशी व कोठे मिळते, याबद्दलची सदर लेखातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून (महानगरपालिका/नगरपालिका) अधिकृत बांधकाम नकाशा परवानगी घेणे बंधनकारक आहे.

नकाशा परवानगीची महत्त्वाची प्रक्रिया-

  • नोंदणी: सर्वात अगोद MahaVastu BPMS या पोर्टलवरती अर्जदार किंवा त्यांच्या वास्तुविशारदाची नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • नकाशा तयार करणे: वास्तुविशारद ‘TP Client’ सॉफ्टवेअरचा वापर करून नियमांनुसार बांधकामाचा नकाशा तयार करतात.
  • कागदपत्रे अपलोड करणे: आवश्यक कागदपत्रांसह नकाशा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केला जातो.
  • शुल्क भरणेः अर्जाच्या छाननीसाठी ऑनलाईन फी भरावी लागते.
  • तपासणी व मंजुरीः नगररचना विभागाचे अधिकारी नकाशाची पडताळणी करतात व सर्व नियम पाळले असल्यास डिजिटल स्वाक्षरीने परवानगी प्रमाणपत्र देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे –

  • मालकी हक्क पुरावा: सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड जमीन
  • मोजणी नकाशा: भूमी अभिलेख विभागाने दिलेला मोजणी नकाशा
  • वास्तुविशारद प्रमाणपत्र: नोंदणीकृत आर्किटेक्चर परवाना प्रत
  • कर पावती: चालू वर्षाची घरपट्टी किंवा मालमत्ता कर भरण्याची पावती
  • NOC: अग्निशमन दल, पर्यावरण विभाग किंवा विमानतळ प्राधिकरणाचे (आवश्यकतेनुसार) ना हरकत प्रमाणपत्र

अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम नकाशा परवानगी प्राप्त करू शकता. कारण या अगोदर वरील परवानगी घेतल्यानंतर देखील अकृषक परवानगी म्हणजेच NA परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता नवीन नियमानुसार नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *