महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने 4 डिसेंबर 2024 रोजी नवीन प्रमाणित प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स(HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. HSRP म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स. या टॅम्पर-प्रूफ आहेत व त्यामध्ये अद्वितीय ओळख क्रमांक, लेझर-एच्च केलेला कोड व सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट व वाहनांच्या बाबतीतील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.
1 एप्रिलपासून कारवाई-
मार्च 2025 पर्यंत या नंबर प्लेट गाडीवर बसवणे गरजेचे आहे. कारण त्यानंतर 1 एप्रिल पासून कारवाई करण्यात येऊन दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे.
नंबर प्लेट बसवण्याची फी-
- टू व्हीलरसाठी- 531 रुपये
- थ्री व्हीलरसाठी- 590 रुपये
- फोर व्हीलरसाठी- 879 रुपये
HSRP प्लेट ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया-
- HSRP प्लेट ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी सर्वात अगोदर https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या अधिकृत वेबसाईटवर जावे. किंवा डायरेक्ट अॅप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा.
- त्यानंतर मेनू मधील HSRP Online Booking या नवीन पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर Apply High Security Registration Plate Online या ठिकाणी RTO ऑफिस सिलेक्ट करून Submit बटणावर क्लिक करावे.
- नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील. त्यातील पहिला ऑप्शन आहे Book High Security Registration Plate व दुसरा आहे HSRP Replacement म्हणजे जर तुमच्याकडे अगोदर हाय सिक्युरिटी प्लेट असेल व ती तुटली किंवा खराब झाली आहे त्यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे.
- जर तुमच्याकडे HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्ही Book High Security Registration Plate या Book वरती क्लिक करावे.
- यामध्ये 6 Step दिलेल्या आहेत. त्यातील पहिली स्टेप म्हणजे Booking Details. त्यामध्ये Registration number म्हणजे गाडीचा नंबर, Chassis No., Engine No. (चासी नंबर व इंजिन नंबर हा RC बुकमध्ये असतो), Mobile No. व Captcha कोड टाकून Click Here या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये Contact Information मध्ये गाडी मालकाचे नाव, ई-मेल आयडी व Billing Address (आधार कार्डवर जो पत्ता आहे तो टाकावा) टाकून Next बटणावर क्लिक करावे.
- पुढे Order Booking Verification मध्ये जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्यावर OTP येईल तो OTP टाकावा व Next बटणावर क्लिक करावे.
- नंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे Appointment at Affixation Centre व दुसरा आहे Home Delivery या मध्ये काही ठराविक जे पिनकोड आहेत त्यांना घरी येऊन नंबर प्लेट बसून दिली जाते. त्यामध्ये चार्जेस थोडे जास्त द्यावे लागणार आहेत.
- Home Delivery फक्त सिलेक्टेड पिनकोडमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी Pincode टाकून Check Availability या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल तुमच्या परिसरामध्ये ही सेवा चालू आहे की नाही. जर ही सेवा सुरु नसेल तर खाली दिलेल्या Affixation Centre Appointment या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये Dealer State मध्ये आपला जिल्हा निवडा व गावाचे नाव टाकून किंवा Near Me या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या जवळील सेंटर दिसतील.
- त्यातील तुम्ही तुमच्या जवळील सेंटर निवडावे. तेथे तुम्हाला किंमत देखील दाखवण्यात येईल. त्यानंतर Confirm Dealer या पर्यायावर क्लिक करावे.
- तीसऱ्या स्टेपमध्ये सोयीस्कर तारीख व वेळ निवडावी व Confirm and proceed या पर्यायावर क्लिक करावे.
- चौथ्या स्टेपमध्ये Booking Summary दाखवली जाईल ती चेक करून Confirm and proceed या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर पाचव्या स्टेपमध्ये सर्व माहिती चेक करावी व त्या ठिकाणी तुम्हाला किती पेमेंट करायचे आहे हे देखील दिसेल. I agree वर क्लिक करून पेमेंट करण्यासाठी Pay Online या पर्यायावर क्लिक करावे.
- पेमेंट करण्यासाठी QR Code किंवा UPI चा पर्याय देण्यात आलेला आहे. त्याद्वारे पेमेंट करू शकता.
- त्यानंतर सहाव्या स्टेपमध्ये तुमच्या समोर HSRP Appointment Receipt दिसेल ती Save करून घ्यावी किंवा मोबाईल मध्ये स्क्रीन शॉट मारून घ्यावी.
- ही Receipt, तुमची गाडी व RC बुक तुम्हाला बोलवल्या तारखेला स्वत: बरोबर घेऊन जायचे आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

