आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे?

आज आपण सदर लेखातून आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक व खाजगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन देखील बनवून घेऊ शकता किंवा मग घरी बसल्या ऑनलाईन बनवू शकता. आता आभा कार्ड काढणे अतिशय सोपे झाले आहे. फक्त काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे आभा कार्ड काढू शकता व तेही फ्री मध्ये. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची प्रक्रिया.

आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे?-

  • आभा कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला https://abha.abdm.gov.in/abha/v3 या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.
  • त्यातील Create ABHA Number या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर दोन पर्याय तुमच्या समोर दिसतील. एक तर तुम्ही आधार कार्डचा वापर करू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
  • जर तुम्हाला आधार कार्ड वापरून आभा कार्ड काढायचं असेल तर त्यासाठी तुमचे आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. तशी सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • पुढे आता आधार नंबर टाकायचा आहे व तिथे देण्यात आलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे. सहमत असाल तर रकान्यात टिक करायचे आहे. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत व त्यानंतर Next बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो तेथे टाकून Next या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर पुढील पेजवर तुम्हाला आधार कार्ड वरील तुमचे नाव, लिंग, फोटो, जन्मतारीख, पत्ता दिसणार आहे. Aadhaar Authentication Successful झाल्याची सूचना तिथे दिसेल. त्यानंतर Next या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे व Next या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही तुमचा ई-मेल अ‍ॅड्रेस देखील आभा क्रमांकाशी जोडू शकता. जर जोडायचा नसेल तर Skip for now या पर्यायावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर तुमचा आभा नंबर तयार झालेली सूचना दिसणार आहे. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता तेथील Link ABHA Address या रकान्यांमध्ये क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही या अगोदर अ‍ॅड्रेस तयार केलाय का? असा प्रश्न येथे विचारला जाईल. तिथल्या No वर क्लिक करून sign up for ABHA Address या रकान्यात क्लिक करायचे आहे.
  • येथे सुरुवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते तुम्ही नीट वाचून ABHA Address तयार करायचा आहे.
  • खालच्या रकान्यात तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासारखे सोपे आहे ते टाकून आभा Address तयार करू शकता. हे टाकून झाले की Create ABHA या रकन्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर तुम्हाला तुमचे आभा कार्ड तयार झालेले दिसेल आता .
  • काही जर Edit करायचे असेल तर डाव्या बाजूला पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये Re-KYC verification चा देखील पर्याय देण्यात आलेला आहे.
  • आभा कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरती दिलेल्या Download ABHA Card या पर्यायावर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यावे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *