शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकरी माहिती संच व त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी कार्ड तयार केले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवडीखालील पोटखराब क्षेत्र समाविष्ट करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी लगेच संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधून सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी विहित प्रक्रिया पार पाडून लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यात येईल. तरी आपण मोठ्या संख्येने फार्मर आयडी तयार करून घ्यावेत.
लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार!-
ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी हा लागवडीसाठी योग्य क्षेत्राकरिता बनवण्यात येत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले आहे, परंतु सातबारावर नोंद नाही अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याद्वारे विहित प्रक्रिया पार पाडून ई-फेरफार प्रणालीद्वारे पोटखराब वर्ग अ क्षेत्र सातबारावर लागवडीखालील क्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे. या स्वरूपांतरीत क्षेत्रामुळे ॲग्रिस्टॅकमधील फार्मर आयडीमध्ये दर्शविलेल्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये आपोआप वाढ होणार आहे.
त्याचबरोबर भविष्यात होणारे जमीन हस्तांतरणाचे व्यवहार देखील फार्मर आयडीशी आपोआप लिंक होणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड बनवत असताना आपले कोणत्याही प्रकारे सातबारा वरील क्षेत्र कमी दाखवले जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी जवळच्या जन सेवा केंद्र म्हणजे सीएससी येथे जाऊन तयार करावा.
अद्यावतीकरण चालू राहणार-
ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून फार्मर आयडीमध्ये पोटखराब खालील लागवडीची जमीन अथवा 7/12 मधील अन्य बदल दर्शवण्याची प्रक्रिया व अद्यावतीकरण निरंतरपणे चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्यास्थितीत जवळच्या जन सेवा केंद्र म्हणजे सीएससी सेंटर येथे जावून फार्मर आयडी तयार करून घ्यावे.
योजनांच्या लाभ वितरणामध्ये येणार सुलभता-
ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री तयार करण्यात येत असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरण अर्थात ई-केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
फार्मर आयडी नसेल तर लाभ मिळणार नाही-
ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला सातबारा आधारला लिंक करून फार्मर आयडी तयार करून घ्यायचा आहे. फार्मर आयडी कार्ड बनवले नाही तर पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पीक अनुदान योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर न चुकता कोणाची वाट न पाहता विनाविलंब शेतकऱ्यांनी आधार आयडी क्रमांक ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंद करावी.
नोंदणी करा-
ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आयडी नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्र किंवा तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

