जर तुम्ही एखाद्या अनुदानाची वाट पाहत असाल व ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहे की नाही? किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, पण ते नेमके कोणत्या अनुदानाचे जमा झालेले आहेत? हे लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे अनुदान येणार होते ते आले का? किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहे ते कशाचे आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर निवडक अनुदानाचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. जसे की पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी सिंचन योजना किंवा या व्यतिरिक्त शासनाच्या इतर योजनांच्या अनुदानाचे डीबीटीद्वारे वितरण केले जात आहे.
मध्यंतरी शासनाचा एक जीआर आला होता. या जीआरमध्ये आत्महत्याग्रस्त 14 जिल्हे ज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा यांसह इतर जिल्हे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे रेशन बंद करून त्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. नेमके कोणत्या अनुदानाचे पैसे खात्यात जमा झाले आहे, हे लक्षात येत नाही. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सदर लेखातून माहिती.
अशी आहे संपूर्ण प्रक्रिया-
- यासाठी सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाच्या pfms.nic.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
- यामधील चौथा पर्याय म्हणजेच Payment Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर त्यातील Know Your Payment या पर्यायावर क्लिक करावे.
- आता पुढील विंडोमध्ये Payment By Account Number अशी विंडो दिसेल.
- यात सर्वात अगोदर आपण वापरत असलेल्या बँकेचे नाव (यामध्ये आपल्यासमोर बँककांची यादी दाखवली जाईल, यातून आपल्या बँकेच्या नावाची निवड करावी.)
- यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. Confirm करण्यासाठी परत एकदा बँक अकाउंट नंबर टाकावा.
- नंतर खालील बॉक्समध्ये कॅप्च्या कोड टाकायचा आहे.
- आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबर OTP पाठवला जाईल, तो OTP या रकान्यात भरायचा आहे. Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्या खात्यावरील माहिती म्हणजेच कोणत्या योजनेचे अनुदान, कोणत्या दिवशी आलेले आहे व किती आले आहे? याबद्दलची सर्व माहिती दाखवली जाईल. या पद्धतीने आपल्याला आपल्या प्रत्येक अनुदानाची माहिती उपलब्ध होणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

