केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारने देशभरातील सर्व शेतकऱ्यांची माहिती व शेती संदर्भातील योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र नोंदणी करण्यास सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांना यामुळे एक आयडी क्रमांक देण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांनी हे ओळखपत्र काढण्यासाठी अर्ज करणे चालू केलेले आहे. परंतु ते कधीपर्यंत मिळणार याची अनेकांना माहिती नाही. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया घरीबसल्या शेतकरी ओळखपत्राचे स्टेटस कसे चेक करावे याबद्दलची माहिती.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे-
- शेतकरी बांधवांना फार्मर आयडी कार्डमुळे सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे.
- यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना बनवणे सरकारला सोपे जाणार आहे.
- सरकारला पीक विम्याचे थेट फायदे देणे सोपे होणार आहे.
- देशभरातील शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे हे देखील यामुळे समजणार आहे.
- देशभरात किती लहान शेतकरी आहेत हे देखील यामुळे सहजपणे शोधता येणार आहे.
- शेतकऱ्यांना नवीनतम कृषी तंत्रज्ञान व डिजिटल सेवांचा थेट यामुळे लाभ घेता येणार आहे.
सदर कार्ड काढण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे–
- आधार कार्ड
- सर्व जमिनींची नोंद
- बँक खाते विवरण
- मोबाईल नंबर
सदर कार्डचे स्टेटस कसे चेक करावे?-
- फार्मर आयडी कार्डचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात आगोदर ॲग्री स्टॅकच्या या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यातील Check Enrollment Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यामध्ये आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून आपली नोंदणी स्थिती सहजपणे तपासता येते.
- नोंदणी क्रमांक असेल तर नोंदणी क्रमांक टाकून Check करावे. जर नोंदणी क्रमांक नसेल तर आधार क्रमांक टाकून Check या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर त्या शेतकऱ्याचे संपूर्ण स्टेटस येणार आहे.
- तेथे दाखवण्यात आलेला Central ID हा फार्मर आयडी कार्डचा नंबर आहे.
- जर Approval Status PENDING दाखवत असेल तर काही अडचण नाही, काही दिवसांनी ते आपोआपच APPROVED होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र गरजेचे–
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत, त्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता म्हणजे 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ही अट 20 व्या हप्त्यापासून लागू करण्यात येणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

