शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन समर्पित आहे व त्या दिशेने तसे प्रयत्न देखील सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात होत आहे. राज्य शासन देखील केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये देते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अर्थसाह्य आता लवकरच 3000 रुपयांनी वाढवण्यात येणाऱ्या असल्याची घोषणा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे 6 हजार रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. आता या निधीमध्ये राज्यशासनाच्या वतीने 3 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे याचा अर्थ असा की राज्यसरकारद्वारे 9 हजार रुपये व केंद्र शासनाचे 6 हजार रुपये असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

