आभा कार्ड हे एक हेल्थ आयडी कार्ड आहे. तसेच हे एक डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे. या कार्डमध्ये आपल्या आरोग्याच्या संबंधित सगळी माहिती असते. या कार्डचा माध्यमातून आपणास डिजिटलरित्या मेडिकल रिपोर्ट व प्रिस्क्रिप्शन घेता येते.
आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय?-
आभा(ABHA) हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे व याच्या मदतीने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाते. हे कार्ड एकप्रकारे आधार कार्ड सारखेच असते व यावर एक 14 अंकी नंबर असतो. याच नंबरचा वापर करून रुग्णांची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकते. त्याचबरोबर यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झालेला आहे, तो कधी व कोणत्या दवाखान्यात झालेला आहे, कोणत्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत, कोणती औषध देण्यात आलेली आहेत, रुग्णांना आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत, तो कोणत्या आरोग्यविषयी योजनांशी जोडला गेलेला आहे ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवण्यात येते.
आभा कार्डचे वैशिष्ट्ये-
- या कार्डचा माध्यमातून आपण डिजिटलरित्या मेडिकल रिपोर्ट व प्रिस्क्रिप्शन घेऊ शकतो.
- या कार्डच्याद्वारे आपण आरोग्यसेवा व्यावसायिकांशी संपर्क साधू शकतो.
- या कार्डमुळे आपण आरोग्यसेवा व्यवसायिकांकडून घरी बसल्या सल्ला घेऊ शकतो.
- या कार्डचा माध्यमातून आपण आरोग्यसेवा व्यवसायिकांकडून मेडिकल हिस्ट्री देखील चेक करू शकता.
- या कार्डद्वारे आपण आरोग्यसेवा व्यवसायिकांकडून योग्य वैद्यकीय मदत घेऊ शकतो.
- तसेच या कार्डाच्या माध्यमातून आपन आरोग्यसेवा व्यवसायिकांकडून चार्जेची माहिती मिळू शकतो.
आभा हेल्थ कार्डचे फायदे-
- आभा हेल्थ कार्डमुळे उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल व कागदपत्रे सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.
- आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजाराची संपूर्ण माहिती असणार आहे.
- मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवण्यात येणार आहे.
- ऑनलाईन उपचार, टेलीमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा देखील मिळणार आहेत
- वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येणार आहे.
आभा कार्ड बनवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर साठी
गोपनीयतेसाठी आभा कार्डमध्ये काय सुविधा आहे?-
आभा कार्ड बनवल्यामुळे तुमची हिस्ट्री कोणाकडेही जाण्याची भीती नाही कारण गोपनीयतेसाठी सरकारनेही एक चांगले पाऊल उचललेले आहे. तुमच्या संमतीशिवाय तुमची मेडिकल हिस्ट्री कोणीच पाहू शकणार नाही. कारण जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी दिलेला आहे त्यावर एक OTP येतो ज्याद्वारे तुमच्या कार्ड वापरासंबंधीत संमती विचारली जाते.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.