महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पण हे करावे लागणार

आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांना दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. मागील पाच महिन्यांपासून बांधकाम कामगार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे पोर्टल बंद होते. परंतु अखेर ते आता सुरू करण्यात आलेले आहे. हा मोठा निर्णय पुणे, मुंबई व नागपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर घेण्यात आलेला आहे.

बांधकाम कामगारांना मिळणार पुन्हा लाभ-

बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून अनेक वर्ष कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळत होता. परंतु गेल्या काही महिन्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे कामगारांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. कामगार संघटनेकडून हा मुद्दा सरकार पुढे वारंवार मांडला जात होता. यामुळे आता बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे विविध सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे. ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यामुळे कामगारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

सदर योजनेबाबतीतील बदल-

  • मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रा डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येणार आहे. बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे. 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा देण्यात येणार आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. ठरलेला तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे.
  • लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत-

ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली होती, त्यांची ती तारीख रद्द केलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी “Change Claim Appointment Date” या बटणावर क्लिक करावे. सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक त्यामध्ये भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.

  • हे परिपत्रक mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. हा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे.

आता बांधकाम कामगारांना अर्ज कसा करता येणार?-

  • बांधकाम कामगारांना नवीन अर्ज व नूतनीकरण पुन्हा आता ऑनलाईन करता येणार आहे.
  • अर्ज प्रक्रिया ही अगोदर सारखीच सोपी व जलद करण्यात आली आहे.
  • कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *