महाराष्ट्रा राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख यांच्याकडून एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता सातबारा, 8अ, फेरफार, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल युगाशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार आहे. तसेच प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणे होण्यास मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. यातील काही सेवा मोफत आहेत तर काही सेवांना शुल्क आकारले जातात. यामध्ये सातबारा उतारा, 8 अ, 8ड, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी या सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आता भूमी अभिलेखची नवीन वेबसाईट उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय काय पाहता येणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सदर लेखातून.
नवीन प्रणालीच्या माध्यमातून दोन स्वतंत्र पोर्टल्स तयार करण्यात आलेले आहेत.
- यातील पहिल्या वेबसाईटची https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx ही लिंक आहे.
- यामध्ये गाव नमुना नंबर, 7/12, 8अ, मालमत्ता पत्रक व क-प्रत पाहणे या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता. फक्त ही माहिती तुम्ही कुठेही वापरू शकत नाही व ही सर्व माहिती तुम्ही फ्री मध्ये पाहू शकता.
- सातबारा पाहण्यासाठी प्रॉपर्टीचा यूआयडी नंबर असेल तर यूआयडी नंबर व मोबाईल नंबर टाकून सर्व माहिती पाहता येते.
- प्रॉपर्टीचा यूआयडी नंबर नसेल तर नाही करून तुम्ही खालील माहितीवर क्लिक करून पाहू शकता.
- यात पहिल्या क्रमांकावर 7/12, दुसऱ्या क्रमांकावर 8अ, तिसऱ्या क्रमांकावर मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड व चौथ्या क्रमांकावर क-प्रत्र अश्या प्रकारची माहिती पाहता येईल.
- समजा सातबारा पाहायचा असेल तर सातबारा यावर क्लिक करा.
- त्यानंतर जिल्हा निवडा, तालुका निवडा, तुमचे जे काही गावाचे नाव असेल ते गावाचे नाव निवडा.
- जर गट नंबर माहिती असेल तर गट नंबर टाका व गट नंबर माहिती नसेल तर नावाने सर्च करा. मोबाईल नंबर टाकून भाषा निवडून कॅप्च्या कोड टाकावा.
- यानंतर तुम्हाला सातबारा पाहायला भेटेल.
- अशाच पद्धतीने इतरही कागदपत्रांची प्रक्रिया करता येणार आहे.
- त्यानंतर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ही दुसऱ्या वेबसाईटची लिंक आहे. या ठिकाणी तुम्हाला नाममात्र शुल्क आकारले जाते.
- या वेबसाईटमध्ये अनेक ऑनलाईन सेवा आहेत जसे की 7/12 उतारा डाऊनलोड, 8अ, मालमत्ता पत्रक इत्यादींसह इतरही बाबी पाहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
- याद्वारे तुम्हाला 7/12 उतारा, 8 अ उतारा, फेरफार प्रत, मालमत्ता पत्रक, 7/12 फेरफारसाठी अर्ज, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती, अधिकार क्षेत्र जाणून घ्या, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, अभिलेख पडताळणी, ई-रिकॉर्ड्स, ई-नकाशा/भू नकाशा ई-मोजणी, ई-क्यू जे कोर्ट, ई-पीक पाहणी, आपली चावडी, ई-चावडी- जमीन महसूल भरणा, महाभूमी API सेवा इत्यादी सेवांचा लाभ घेता येणार आहे.
- अशा पद्धतीने एक फ्री सेवा देणारी व दुसरी शुल्क आकारणारी अशा दोन स्वतंत्र वेबसाईट सध्या कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे-
शेतकऱ्यांना या नवीन डिजिटल प्रणालींमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीसाठी कर्ज घेताना 7/12 व 8अ गरजेचे असते. हे कागदपत्रे घरी बसल्या उपलब्ध झाल्यामुळे बँकेच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही. त्याचबरोबर मालमत्ता खरेदी विक्री करताना 7/12 व फेरफार लगेच उपलब्ध झाल्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होणार आहे. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून भ्रष्टाचारालाही आळा बसवण्यास मदत मिळणार आहे. अनेकदा तहसील कार्यालयातून 7/12 मिळण्यासाठी लोकांना दलालांची मदत घ्यावी लागते.
तसेच ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे दलालांची गरज भासणार नाही व नागरिकांना थेट माहिती मिळणार आहे. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा पूर्णपणे पारदर्शक व सोयीस्कर असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तुम्ही जर जमीनधारक असाल तर वरील वेबसाईटचा वापर करून तुम्ही तुमच्या मालमत्तेची स्थिती पण तपासून पहा व वेळेची बचत करा.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.