जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम राहणार तीन दिवस बंद!

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्व्हर हे गुरुवारी (दि.14) रोजी मध्यरात्रीपासून रविवारी (दि.17) रोजी मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दस्त नोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिलेली आहे. हा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घेतलेला आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीसह अन्य सेवा ही बंद असणार आहेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. सर्व्हरच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे सर्व्हर हे तीन दिवस बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *