मोबाईल ॲपचा वापर करून कशी करावी ई-पीक पाहणी?

खरीप हंगामातेल ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करत असताना अडचणी येत होत्या, त्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ हे ॲप सुरू केलेले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या मोबाइल फोनद्वारे पिकांचा पेरा, बांधावरील झाडे व क्षेत्राची नोंद करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची, बांधावरील झाडांची व पडीक जमिनीची नोंदणी स्वतःच करता येते. त्यामुळे शासनाकडे पिकांची अचूक माहिती ही जमा होते.

असे वापरायचे ॲप-

  • सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ई-पीक पाहणी’ हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर नवीन वापरकर्त्यांनी आधार क्रमांक व मोबाईल नंबर वापरून नोंदणी करायची आहे.
  • आता पुढे सातबाऱ्यावरील शेतीचा गट क्रमांक निवडायचा आहे.
  • त्यानंतर लागवड केलेल्या पिकाचा प्रकार निवडायचा आहे व ॲपमधील कॅमेऱ्याने पिकाचा त्याचबरोबर क्षेत्राचा फोटो काढून अपलोड करायचा आहे.
  • सर्व माहिती भरून झाली की ती जतन करायची आहे.
  • हा ई-पीक पाहणी प्रकल्प आता प्रायोगिक तत्त्वावर न राहता, संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आलेला आहे.
  • पिकांची अचूक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्याला पिकाचा फोटो शेताच्या 50 मीटरचा आतूनच काढणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

ई-पीक पाहणी अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सोपे झालेले आहे. या तंत्रज्ञानामुळे शासनाकडे पिकांची अचूक व अद्यावत माहिती उपलब्ध होते. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या अ‍ॅपचा वापर करावा व आधुनिक शेतीचा भाग बनावे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *