ई-रिक्षा अनुदान योजनेच्या लाभासाठी UDID Disability Certificate असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर ते कसे ऑनलाईन डाऊनलोड करावे याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. सध्या ई-रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 3 लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येते. ज्या लाभार्थ्यांकडे UDID Card आहे त्याच लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय उभा करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणारी पर्यावरण पुरक फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी अशा व्यक्ती अर्ज करु शकतात ज्याचे दिव्यांगात्वाचे प्रमाण 40% पेक्षा जास्त आहे. या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र. हे तुम्ही अगदी कमी वेळात ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. तुमच्याकडे जर UDID Disability Certificate नसेल तर तुम्ही फिरत्या वाहनावरील दुकान या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या ई-रिक्षा योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.
विविध योजनांसाठी उपयोगी पडते UDID Disability Certificate व कार्ड-
शासनाकडून दिव्यांग व्यक्तीसाठी फक्त ई-रिक्षाच नाही तर विविध योजना राबवल्या जातात. तुमच्याकडे जर UDID Disability Certificate असेल तर तुम्ही शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ शकता. हे सर्टिफिकेट व कार्ड अगदी काही वेळातच ऑनलाईन पद्धतीने PDF मध्ये डाऊनलोड करता येते. PDF डाऊनलोड झाल्यानंतर ती सेव्ह करून घ्यावे व त्याची प्रिंट काढावी.
असे करा UDID कार्ड व सर्टिफिकेट डाऊनलोड-
- सर्वात अगोदर Unique Disability ID या वेबसाईटवर जावे.
- त्यामधील PwD login या पर्यावर क्लिक करावे.
- त्यामध्ये Enrolment Number किंवा UDID नंबर टाकावा. अर्ज केल्यानंतर जी पावती मिळते त्यावर Enrolment Number असतो. दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र असते त्यावर UDID नंबर दिलेला असतो.
- कॅप्चा भरून लॉगीन करावे.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर dashbaord तुम्हाला दिसेल. तेथे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली.
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील Download your E UDID disability Certificate पर्यायावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुम्ही दिव्यांगाचे प्रमाणपत्र PDF स्वरुपात डाऊनलोड करू शकता.
- UDID Card डाऊनलोड करण्यासाठी परत वेबसाईटवर या. Download your E UDID disability Certificate या पर्यायाच्या खाली तुम्हाला Download your E UDID Card असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केले की तुम्ही कार्ड डाऊनलोड करू शकता.
- या प्रकारे तुम्ही दिव्यांग प्रमानपत्र व UDID कार्ड डाऊनलोड करु शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.