UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत?

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी युआयडी कार्ड असणे गरजेचे आहे. जर युआयडी कार्ड नसेल तर दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. युआयडी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

युआयडी कार्डचे फायदे-

  • प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला यामुळे एक युनिक नंबर देण्यात येतो जो की शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी संपूर्ण देशांमध्ये ग्राह्य धरण्यात येतो.
  • युआयडी कार्डमुळे संपूर्ण देशातील दिव्यांग व्यक्तींचा डाटा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
  • दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवणे देखील यामुळे सोपे होणार आहे.

सदर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे-

  • आधार कार्डची स्कॅन कॉपी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी स्कॅन केलेली
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र

सदर कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर www.swavlambancard.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • वेबसाईटचा उजव्या बाजूला दिसणाऱ्या Apply for Disability certificate and UDID card या पर्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती Registration form ओपन होईल.
  • तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रिंट तुमच्याजवळील शासकीय जिल्हा वैद्यकीय कार्यालयांमध्ये द्यायची आहे.
  • त्यानंतरच तुम्हाला online UDID card download करता येणार आहे.
  • तुमच्या ई-मेल आयडीवर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबरवर Enrolment Number येईल तो संभाळून ठेवावा. या Enrolment Number चा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस देखील पाहू शकता. जर तुम्ही लवकरात लवकर हे कार्ड डाऊनलोड केले तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *