फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचे अर्ज चालू!

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या म्हणजेच पर्यावरणाशी पूरक असणाऱ्या रिक्षा म्हणजेच फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त 3 लाख 75 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते.

या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या योजनेसाठीचा अर्ज करण्याचा कालावधी हा 22 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 असा आहे. या योजनेचा अर्ज MSHFDC या वेबसाईटवर जाऊन करावा लागणार आहे. अर्ज करताना जर काही समस्या किंवा अडचण आली तर MSHFDC या वेबसाईटवर मदतीसाठी संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी देण्यात आलेला आहे.

सदर योजनेची पात्रता

  • या योजनेसाठी ज्या व्यक्ती 40% पेक्षा जास्त अपंग आहेत अशाच व्यक्ती अर्ज करू शकतात.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • निवासी पुरावा
  • दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
  • UDID प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • बँक पासबुकचे पहिले पान स्कॅन केलेले असावे

सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी https://register.mshfdc.co.in/home या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • तेथील नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर त्यामध्ये वैयक्तिक माहिती म्हणजेच मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, यूडीआयडी क्रमांक, ई-मेल आयडी टाकावा व पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर step-2 मध्ये पुन्हा वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थ्याचे पहिले नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लाभार्थ्याचे आडनाव, जन्मतारीख, लाभार्थ्याचे वय, लिंग, रक्तगट, जात/प्रवर्ग व त्यानंतर जात प्रमाणपत्र अपलोड करावे. त्यानंतर वाहन प्रकार, वैवाहिक स्थिती ही सर्व माहिती भरून पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
  • पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी निवासाचा तपशील टाकावा. यामध्ये सध्याचा पत्ता, पिनकोड, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, गाव व पत्ता पुरावा अपलोड करून पुढे जा या पर्यावर क्लिक करावे.
  • नंतर पुढे दिव्यांगाची माहिती टाकायची आहे, त्यामध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे, तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाण, दिव्यांगत्वाचे प्रकार, दिव्यांगत्वाचे क्षेत्र टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर पुढे रोजगाराची सध्यास्थिती यामध्ये रोजगाराची स्थिती, सरकारी कर्मचारी आहात का?, दारिद्र्यरेषेबद्दलची माहिती व लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न याबद्दलची माहिती भरून पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर पुढे ओळख व बँक तपशील यामध्ये ओळख प्रमाणपत्र अपलोड करावे. यानंतर लाभार्थ्याचा बँक तपशील यामध्ये खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचे नाव तसेच बँक पासबुकचे पहिले पान अपलोड करावे. तसेच फोटो अपलोड करायचे आहेत व सही अपलोड करून पुढे जा या पर्यावरती क्लिक करावे.
  • फिरत्या वाहनावरील दुकानासाठी योजनेची सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती परिपूर्ण असेल तरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तसेच दिलेल्या ई-मेल आयडीवर आपला रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल. भविष्यात आपल्याला जर अर्जाची सद्यस्थितीत तपासण्यासाठी त्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करावा.

सदर योजनेच्या अर्जाचा पाठपुरावा कसा करावा –

  • सदर योजनेचा अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी https://register.mshfdc.co.in/trackApplication या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • त्यामध्ये आपला नोंदणी क्रमांक आणि नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकावा.
  • त्यावर OTP पाठवण्यात येईल. तो OTP टाकून आपल्याला आपल्या अर्जाचा पाठपुरावा घेता येणार आहे.
  • जर आपणास दुसऱ्या काही समस्या असल्यास, माहिती हवी असेल किंवा तांत्रिक अडचणी असल्यास आपण 7820904081/ 9090118218 या क्रमांकावर कॉल करावा किंवा एसएमएस किंवा व्हाट्सअप करू शकता किंवा evehicle.mshfdc@gmail.com या ई-मेल आयडीवर देखील आपली समस्या ई-मेल करू शकता.

नोट– अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

सूचना PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *