बांधकाम कामगार नवीन नोंदणी/रिन्यूअल पावती कशी काढावी?

बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून नवीन नोंदणी किंवा रिन्यूअल करण्यासाठी या अ‍गोदर एक रुपया फी भरावी लागत होती व त्यानंतरच पावती मिळत होती. जेव्हा पावती मिळेल त्यानंतरच योजनेचा लाभ मिळत होता. परंतु मागच्या महिन्यात 13 ऑगस्ट 2025 रोजी जो GR आला होता त्यामध्ये एक रुपयाची पावती भरावी लागणार नाही, असे सांगण्यात आले होते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आता ही योजना बांधकाम कामगारांसाठी मोफत करण्यात आलेली आहे. आता एक रुपया ही भरण्याची गरज नाही. ही पावती डायरेक्ट डाऊनलोड करता येणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया ही पावती मोबाईलवरती कशी डाऊनलोड करायची.

सदर योजनेची पावती डाऊनलोड कशी करावी-

  • सर्वात अगोदर गुगल वरती जाऊन mahabocw प्रोफाईल हे सर्च करायचे आहे. त्यानंतर Mahabocw Profile Login येथे क्लिक करावे किंवा डायरेक्ट वेबसाईटवरती जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आता तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व सद्यस्थितीला सुरू असलेल्या मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर तोच टाका जो तुम्ही नोंदणी करताना टाकलेला होता.
  • त्यानंतर Proceed to Form या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक OTP येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे व Validate OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्ही लॉगिन झालेला आहात. पेजला खाली स्क्रोल करावे. त्यामध्ये शेवटून दोन नंबरचा Acknowledgement Details हा जो पर्याय आहे, त्यावरती क्लिक करावे व त्यानंतर Print Registration Acknowledgement या हिरव्या रंगाच्या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर छोटीशी पावती दिसेल, तिला Zoom करता येते. त्यातील Print वरती क्लिक करायचे आहे.
  • हीच पावती तुमच्या मोबाईलमध्ये Save करण्यासाठी Save as PDF वरती क्लिक करावे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *