लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झालेली आहे की नाही? कसे तपासावे?

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. या योजनेची तुमची ई-केवायसी प्रक्रिया  झालेली आहे की नाही? हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना पुढील दोन महिन्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. तरच या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया.

ई-केवायसी प्रक्रिया झालेली आहे की नाही, कसे पहावे?-

Step 1- अधिकृत वेबसाईटवरती जावे.

  • ई-केवायसी प्रक्रिया झालेली आहे की नाही? हे पाहण्यासाठी सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.

Step 2- E-KYC चा पर्याय निवडावा.

  • तेथे गेल्यानंतर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे” या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे.

Step 3- आधार व कॅप्चा टाकावा.

  • या पेजवरती तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.
  • लाभार्थी आधार क्रमांक- येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे.
  • कॅप्च्या- बाजूला दिसणारी अक्षरे व अंक जसेच्या तसे भरावेत.
  • नंतर ‘मी सहमत आहे’ येथे टीक करायचे आहे.

Step 4- ओटीपी पाठवा या बॉक्सवरती क्लिक करावे.

Step 5- E-KYC स्टेटस तपासा.

  • ओटीपी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर अशी Warning जर आली तर ‘या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे’.
  • म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आता काही काळजी करण्याची गरज नाही.

नोट– महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *