महाराष्ट्र राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. या योजनेचे आतापर्यंत 14 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. पण आता या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
सर्व पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करण्यासंदर्भात नुकता शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा निर्णय जाहीर झाल्यापासून पुढील दोन महिन्याच्या अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी करण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक महिलांना ही प्रक्रिया करत असताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ई-केवायसी करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय?-
- सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे बऱ्याचशा लाभार्थी महिलांना ‘Unable to send OTP’ हा एरर येत आहे. याचे कारण असे आहे की या वेबसाईटवरती दोन कोटी पेक्षा जास्त महिला भेट देत आहेत. त्यामुळे या वेबसाईटला लोड येत आहे. याच्या वरती उपाय असा आहे की तुम्ही थोड्या दिवसांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी किंवा रात्रीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
- ज्या बहीणींना जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्या बहीणींनी काय करावे? त्यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी व ज्या महिला ई-केवायसी प्रक्रियेमध्ये पात्र ठरतील त्या महिलांना तिन्ही महिन्याचा लाभ एकत्रित देण्यात येईल.
- भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना आधार नंबर टाकल्यानंतर ‘सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही’ असा एरर येत आहे. याचा अर्थ असा आहे की त्या लाभार्थी महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत म्हणजेच त्या महिला या योजनेच्या लाभास अपात्र ठरलेल्या आहेत.
- पती किंवा वडील हयात नसल्यास काय ऑप्शन आहे का? याबद्दल शासनाने विचार करायला हवा होता. यासाठी कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही.
- पती की वडीलांचा नक्की आधार नंबर कोणाचा टाकायचा? जर तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचे नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे व तुमच्या आधार कार्डवरती नवऱ्याचे नाव असेल तर तुमच्या नवऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करायचा असेल तर काय करावे? ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली की आपोआपच या योजनेचा लाभ बंद होईल.
- अविवाहित किंवा विधवा महिला असेल तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या आधार कार्डचा नंबर द्यावा लागणार आहे.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचे आधार कार्ड तुम्ही वापरत आहात पती किंवा वडिलांचे ते आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसल्यास आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाऊन लिंक करून घ्यावे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.