कृषी यंत्रसामग्रीवरील केंद्र शासनाचे नवे दरपत्रक जाहीर?

दिल्ली येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये वस्तू व सेवा करात GST अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांपैकी कृषी यंत्रसामग्रीसाठी झालेल्या सुधारणांची चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी जीएसटी दरामध्ये कपात केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले व बैठकीतील चर्चेचे तपशील उपस्थित्यांना सांगितले.

कृषी यंत्रसामग्रीवर या अगोदर 12 टक्के व 18 टक्के जीएसटी होता परंतु तो आता कमी करून 5% करण्यात आलेला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजे 22 सप्टेंबर पासून नवीन दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मंडळ संघटनेच्या बैठकीदरम्यान यंत्रे उत्पादक संघटनेच्या सर्व प्रतिनिधींना असे निर्देश देण्यात आलेले आहेत की 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी दराच्या कपातीचा थेट लाभ संपूर्ण पारदर्शकतेसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा.

कोणती अवजारे किती रुपयांनी स्वस्त होणार?-

35 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 45 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 45,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर 75 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 63,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. विद्युत तणनाशक यंत्र (7.5 अश्वशक्ती): रु.5,495 ने स्वस्त, मालवाहू वाहन ट्रेलर (5-टन क्षमता): रु.10,500 ने स्वस्त, बी पेरणी व खत यंत्र (11 फाळ): रु.3,220 ने स्वस्त, बी पेरणी व खत यंत्र (13 फाळ): रु.4,375 ने स्वस्त, मळणी कापणी पट्टी यंत्र (14 फूट): रु.1,87,500 ने स्वस्त, पेंढा संकलक यंत्र (5 फूट): रु.21,875 ने स्वस्त, सुपर सीडर (8 फूट): रु.16,875 ने स्वस्त, हॅपी सीडर (10 फाळ): रु.10,625 ने स्वस्त, फिरता नांगर (6 फूट): रु.7,812 ने स्वस्त, चौकोनी गाठणी यंत्र (6 फूट): रु.93,750 ने स्वस्त, मल्चर (8 फूट): रु.11,562 ने स्वस्त, हवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र (4-रांगा): रु.32,812 ने स्वस्त, ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र (400-लिटर क्षमता): रु.9,375 ने स्वस्त

अगदी बागकामासाठी त्याचबरोबर बेणणीसाठी वापरले जाणारे छोटे ट्रॅक्टर्स देखील आता स्वस्त होणार आहेत. चार रांगांचे भात लावणी यंत्र आता 15,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. विविध पिकांसाठी वापरण्यात येणारे प्रति तास 4 टनांचे मळणी यंत्र 14,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. 13 अश्वशक्तीच्या पॉवर टिलरची किंमत देखील 11,875 रुपयांनी कमी होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने या लाभांविषयीची माहिती विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात येणार आहे. आता यामुळे उपकरने भाड्यावर देणारी केंद्र कमी किमतीत यंत्रसामग्री मिळू शकणार आहे. यामुळे त्यांनीही शेतकऱ्यांना परवडणाच्या दृष्टीने भाड्याचे दर कमी करावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

रब्बी पिकासाठी येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यापासून वस्तू व सेवा कर दर कपातीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे शेतकरी या लाभांचा आधुनिक शेतीसाठी योग्यरित्या उपयोग करून घेऊ शकतील, असे ते म्हणाले. कृषी यांत्रिकीकरणाला बळकटी देण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, या दृष्टीने भविष्यात योजना तयार करताना उत्पादक संघटनांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित उपकरणाच्या नवीन किमतीविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *