मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळवण्यासाठी सर्व पात्र महिलांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिबार्य आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत मिळणार नाही.
e-KYC करण्याची अंतिम मुदत-
शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या सर्व पात्र महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरु झालेली आहे व ती 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे.
e-KYC प्रक्रिया का महत्त्वाची आहे?-
या योजनेचा लाभ काही अपात्र लाभार्थी आढळून आल्यामुळे या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व योग्य लाभार्थ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे. यामुळे लाभार्थ्यांची ओळख व पात्रता पडताळणी करण्यात येईल व त्यामुळे बनावट त्याचबरोबर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे.
e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी?-
लाभार्थी महिलांना घरीबसल्या ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सरकारी सेवा केंद्रात जाऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
ऑनलाईन प्रक्रिया कशी करावी-
- सर्वात अगोदर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे.
- पुढे वेबसाईटच्या होम पेजवरती असणाऱ्या ई-केवायसीच्या लिंकवरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकायचा आहे.
- तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल तो OTP टाकून तुमची माहिती प्रमाणीत करायची आहे.
- त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व आवश्यक माहिती भरायची आहे. त्यांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP टाकून माहिती प्रमाणित करावी.
- आवश्यक माहिती व स्वयं-घोषणापत्र सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी.
सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
- पती किंवा वडिलांचे आधार कार्ड किंवा त्यांच्याशी जोडलेला मोबाईल नंबर
दरवर्षी होणारी e-KYC-
यापुढे दरवर्षी जून महिन्यापासून योजनेच्या लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व वेळेवर आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.