मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाने ईकेवायसी प्रक्रिया चालू केलेली आहे. ही ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. दरम्यान, ई-केवायसी नेमकी कशी करावी? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
तसेच या योजनेच्या संदर्भात ई-केवायसी करत असताना महिलांना अनेक प्रश्न पडत आहेत. जर महिलांनी ई-केवायसी करताना योग्य काळजी घेतली नाही तर त्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून काढले जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी करत असताना पहिला व दुसरा मुद्दा आता अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
ई-केवायसी नेमके का करण्यात येते?-
लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांनी नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेला आहे. त्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर इतरही काही गैरप्रकार आढळून आल्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे. पात्र व योग्य महिलेलाच या योजनेचा लाभ मिळवा या उद्देशाने हे शासनाच्या माध्यमातून पाऊल उचलण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या बाबी-
ई-केवायसी करण्यासाठी महिलांना दोन बाबी प्रमाणित कराव्या लागत आहेत. सदर बाबी प्रमाणित केल्यानंतरच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यातील दुसरा मुद्दा थोडा अडचणीचा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक विचार करुन योग्य तो पर्याय निवडावा. दुसऱ्या मुद्द्यात तुम्हाला माझ्या कुटुंबात फक्त एक विवाहित व एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहे याबाबत होय किंवा नाही याचे उत्तर द्यायचे आहे.
त्याचबरोबर पहिल्या मुद्द्यांमध्येही तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे प्रमाणित करायचे आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसेल व तुम्ही होय या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला मिळणाऱ्या योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळेच या दोन्ही पर्यायाचे उत्तर देताना योग्य पर्यायाची निवड केलीली आहे की नाही? याची खात्री करावी व त्यानंतरच ई-केवायसीचे सबमिट बटन दाबावे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.