ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त?

खरीप हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावरती उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्कच्यावेळी नोंदणी पूर्ण करावी व डेटा अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने सकाळी ऑफलाइन पध्दतीने पीक पाहणी करुन रात्री चांगल्या नेटवर्क वेळी नोंदणी पूर्ण करण्याचे व डेटा अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून खरीप 2025-26 साठी ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी ‘डीसीएस ई-पीक पाहणी’ (व्हर्जन 4.0.0) या मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन पीक नोंदणी करावी. परंतु सर्व्हरला येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे नोंदणी प्रक्रियेला जास्त वेळ लागत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना ॲप नीट काम करत नसल्याचा भ्रम निर्माण झालेला आहे. रात्री गावात किंवा शहरात चांगल्या इंटरनेटच्या वेळी नोंदणी पूर्ण करावी. ऑफलाईन पद्धतीने सकाळी शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करावी व रात्री परत चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन अ‍ॅपमधील डेटा सेव्ह करण्यासाठी ‘अपलोड’ बटन दाबावे.

नोंदणीसाठी आवश्यक सूचना-

  • रात्री चांगल्या नेटवर्कच्या वेळी नोंदणी पूर्ण करावी.
  • सकाळी ऑफलाईन पद्धतीने शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करावी.
  • रात्री अ‍ॅपमधील ‘अपलोड’ बटन दाबून डेटा सेव्ह करावा.

ई-पीक पाहणीचे फायदे-

  • पीक कर्ज व विमा मिळणे सोपे होते.
  • अक्षांश-रेखांश तंत्रज्ञानाद्वारे पिकांची अचूक नोंद मिळते.
  • नुकसान भरपाई व शासकीय योजनांचा लाभ मिळतो.

ई-पीक कसे वापरावे-

  1. अ‍ॅप डाऊनलोड अ लॉगिन- सर्वात अगोदर गुगल प्ले-स्टोअरवरती जाऊन ‘ई-पीक पाहणी डीसीएस 4.0.0’ हे अपडेटेड व्हर्जनचे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर आधार किंवा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करावे. पुढे लॉगिन झाल्यावरती शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा गट क्रमांक निवडायचा आहे. पिकांची माहिती जसे की पीक क्षेत्र, पेरणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक भरायची आहे.
  2. फ़ोटो अपलोड करणे- ॲपमध्ये आता 50 मीटरच्या आतून पिकांचा फोटो काढने बंधनकारक आहे. ज्यामुळे पिकाची अचूक माहिती मिळणार आहे. एकदा माहिती जतन केल्यावरती सातबारावर नोंदवली जाते. यामुळे शेतातील पिकांची नोंदणी अधिकृतपणे होते.
  3. दुरुस्ती करण्याची सोय- नोंदणी करत असताना काही चूक झाल्यास, शेतकरी 48 तासांच्या आत अ‍ॅपमधून ती दुरुस्ती करू शकतात.
  4. बांधावरील झाडे व पडीक क्षेत्राची नोंद- या अ‍ॅपच्या माध्यमातून बांधावरील झाडे व पडीक क्षेत्राची नोंदही करता येते. त्यामुळे जमिनीच्या संपूर्ण क्षेत्राचे अचूक माहिती मिळते.
  5. नकाशावर स्थान निश्चिती- या ॲपमुळे नकाशावर शेतीच्या स्थानाची निश्चिती करण्याची सोय असल्याने अचूकता वाढते. याची मदत घेऊन शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करून घ्यावी.

डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी-

यावर्षी ई-पीक पाहणी ही डीसीएस मोबाईल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरती 4.0.0 हे व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पीकपेरा नोंद करावी.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सहायकांची नेमणूक-

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे. हे सहाय्यक अ‍ॅपचा वापर, पिकांची नोंदणी व फोटो अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन करतील.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *