ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही?

राज्यांमध्ये 1 ऑगस्टपासून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे. परंतु नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन किंवा ॲपमध्ये समस्या येणार नाहीत. प्रकल्प विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकाच्या फोटोसह ऑनलाईन पेरा शेतकऱ्यांना नोंदवता येतो. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड झाल्यानंतर आधार व मोबाईल नंबर वापरून विभागाची नोंदणीनंतर शेतकरी लॉगिन करावे लागते.

त्यानंतर आपल्या नावावरील जमीन निवडावी, पीक निवडावे, पीक क्षेत्र, पेरणी दिनांक, फोटो इत्यादी माहिती भरावी लागते. नोंद सेव्ह केल्यावरती सातबारावरती पिकाची नोंद होते. परंतु हे ॲप शेतकरी लॉगिन नंतर पुढे जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी लॉगिन नंतर अ‍ॅप पुढे सरकत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे खाली देण्यात आलेल्या गोष्टी मोबाईलमध्ये करून पहा, ई-पीक पाहणी करत असताना येणारी अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.  

या गोष्टी करा-

  • आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या ई-पीक पाहणी (DCS) V:4.0.0. App ICON वरती Click करावे.
  • त्यामध्ये दोन पर्याय दिसतील. त्यातील App info हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतर Storage and Cache हा पर्यायाची निवड करावी. Clear Storage व Clear Cache या पर्यायामधील माहिती Clear करावी.
  • पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी App परत Open करावे.
  • असे केल्यामुळे Buffering (गोल गोल फिरण्याची) अडचण दूर होणार आहे व प्रक्रिया जलदरीतीने पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.
  • अत्यंत महत्त्वाचे: पीक पाहणी करण्यासाठी शेतात गेल्यावरती आपल्या Mobile चे इंटरनेट Connection चांगले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
  • नोंदणी करताना पहिला OTP येण्यासाठी इंटरनेट Connection चांगले असणे गरजेचे आहे.
  • उर्वरित पीकपाहणी Offline Mode मध्ये करता येते.
  • पूर्ण केलेली पीक पाहणी अपलोड करत असताना इंटरनेट Connection गरजेचे आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *