पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. भीमा व निरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख वेगाने पाणी येत आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी (ता.19) पर्यंत 105.25% टक्के जलसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे व पुणे जिल्ह्यातील धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताणा पाहायला मिळत आहे.
त्यामुळे सायंकाळी सात वाजता धरणातून 75 हजार तर वीजनिर्मितीसाठी 1 हजार 600 विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदीत 76 हजार 600 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे. पुराच्या शक्यतेने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यासह घाट माथ्यावरती सतत पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. भिमा व निरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे 105 टक्के भरलेल्या उजनीच्या साठ्यात बुधवारी (ता.20) रोजी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूरनियंत्रणासाठी रात्री नऊ पासून 75 हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदीपात्रातील साहित्य, जनावरे तत्काळ हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
काल दिवसभरामध्ये विसर्ग 1600 वरून 75 हजार 600 क्युसेकवर-
सकाळी 6 वाजता उजनीतून 1 हजार 600 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला होता. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे दुपारी बारा वाजता तो 5 हजार, दुपारी दोन वाजता 10 हजार, दुपारी चार वाजता 15 हजार तर सायंकाळी पाच वाजता 25 हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन खबरदारी म्हणून सायंकाळी सात वाजता विसर्ग 41 हजार 600 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर रात्री आठ वाजता तो 61 हजार 600 क्युसेक केलेला आहे.
नदीकाठावरील सर्वांना सतर्कतेचा इशारा-
पूरनियंत्रणासाठी उजनीतून मोठा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आलेले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार धरणात येणाऱ्या पावसाच्या अवकीनुसार धरणातून विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
आकडेवारी-
- उजनीतील जलसाठा- 105.25 टक्के
- उजनीतून भीमा नदीमध्ये विसर्ग- 76,600 क्युसेक
- दौंडमधून उजनीत आवक- 12,000 क्युसेक
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.