पुणे शहरासह परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवरती खडकवासला धरण प्रशासनाने (दि.19 ऑगस्ट 2025 म्हणजेच मंगळवार रोजी) दुपारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे. सकाळी सोडण्यात आलेला 9,659 क्युसेक विसर्ग दुपारी एक वाजता वाढवून 11,878 क्युसेक केलेला आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील बहुतेक धरणांमधील पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
पुण्यासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा, झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवरती खडकवासला धरण प्रशासनाने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान पुण्यातील बहुतांश धरणे आता भरत आलेली आहेत. अनेक धरणे आता पूर्ण भरल्यामुळे काही धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. मुठा नदीकाठी व नदीपात्राच्या जवळ राहणाऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केलेले आहे. पावसाचा जोर कसा राहतो त्यावर विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आलेले आहे.
पुण्यात परिस्थिती नियंत्रणास सतर्कतेचा इशारा-
पुणे जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सर्व यंत्रणा सतर्क आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे.” शहरातील काही भागात जर पाऊस असाच सुरू राहिला तर पूर येण्याची शक्यता आहे”. धरणसाखळी क्षेत्रात पाऊस वाढला तर विसर्ग वाढवावा लागू शकतो. शहरी भागात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पूर नियंत्रण रेषेत येणाऱ्या भागातील नागरिकांना गरज पडली तर स्थलांतरित करण्यात येईल, असे डुडी यांनी स्पष्ट केलेले आहे. खडकवासला धरणासह पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमधून पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याचे मुठा नदीकाठी राहणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांचे सतत परिस्थितीवरती लक्ष आहे.
पुण्यातला इतर धरणांची परिस्थिती-
पुण्यातील बहुतांश धरण आता भरत आलेली आहेत. काही धरण पूर्ण भरलेली आहेत. चाकसमान, भाटघर, मुळशी, ठोकरवाडी ही धरणे 100 टक्के भरलेली आहेत. तर पानशेत धरण हे 97.6%, मीरा देवघर 97.90% व डिंभे धरण हे 93.43% भरलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.