पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्याची कारणे?

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेतकऱ्यांना 6 हजार रुपये हे डीबीटीच्या साह्याने तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकऱ्यांना या योजनेचा नुकताच 20 वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून 20 व्या हफ्त्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. हा लाभ नियमित मिळवण्यासाठी दरवर्षी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. परंतु शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश देऊन ही शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. यामुळे त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

सदर योजनेची माहिती-

ही योजना केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवते. या योजनेच्या माध्यमातून 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

सदर योजनेचा हप्ता न मिळण्याची कारणे-

  • जमिनीच्या नोंदणीतील त्रुटी: कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची नोंदी केल्यामुळे
  • आधार लिंकिंग नाही: बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यामुळे
  • पात्रता निकष पूर्ण नाही: सरकारी नोकरी, 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन
  • तांत्रिक अडचणी: पोर्टलमधील त्रुटी

सदर योजनेची ई-केवायसी कोठे करावी?-

  • ऑनलाईन: सदर योजनेची ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यातील ‘ई-केवायसी’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये आधार क्रमांक टाकावा व ओटीपीद्वारे पडताळणी करायची आहे.
  • ऑफलाईन: या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करावी.
  • मोबाईल अ‍ॅपद्वारे: मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातूनही ई-केवायसी पूर्ण करता येते.
  • हेल्पलाइन क्रमांक: काही अडचण आल्यास तर संपर्क साधाण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *