भारतीय कांदा बाजारात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. त्याचबरोबर बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना दिलेला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात चालू झालेले आहे. परंतु ही निर्यात सध्या स्थितीत किरकोळ स्वरूपाची असल्याचे कांदा निर्यातदार, व्यापारी यांचे म्हणणे आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवरती बांगलादेश सरकारने आयातीला परवानगी दिली की भारतीय कांद्याची निर्यात होईल, अशी आशा होती. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये वाढत्या कांद्याच्या किंमतीस आळा घालण्यास मदत मिळेल यासाठी तेथील वाणिज्य मंत्रालयाने आयात परमिटला देखील मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळपास आठ महिन्यानंतर भारतामधून आयात पुन्हा सुरू झालेले आहे. यामुळे स्थानिक ठिकाणी किंमती स्थिर होण्यास मदत मिळणार आहे. याबाबत बांगलादेश येथील स्थानिक वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ढाका येथील श्याम बाजारामध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कांद्याच्या किंमती ह्या 7 ते 10 टक्क्यांनी कमी झालेल्या आहेत. तसेच भारतीय निर्यातदारांकडून गाड्या पाठवण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही गाड्या बॉर्डरवरती पोहचल्या आहेत. तसेच काही गाड्या भरण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एका व्यापाऱ्याकडून मिळालेली आहे.
बाजारपेठेवरती होणारा परिणाम-
स्थानिक बंगाली व्यापाऱ्यांच्या मते फक्त आयात परमिटच्या बातमीनेच कांद्याचे दर हे 10 टक्क्यांपर्यंत प्रति किलो कमी होऊ शकतात. तर बाजारात भारतीय कांदा दाखल झाल्यानंतर दरात आणखी घट येण्याची शक्यता आहे. यामुळे कांद्याची सट्टेबाजी व किंमतीवरील सट्टेबाजी कमी होण्यास मदत मिळेल व एक मानवनिर्मित संकट टळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून बांगलादेशकडून कांदा आयात चालू झालेली आहे. जवळपास साडेसातशे गाडी बॉर्डरवरती उभी असल्याचे समजले आहे. बॉर्डर देखील चालू झाली आहे. लवकरात ही निर्यात सुरळीत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.