पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व उपाय!

पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6-6 हजार रुपये असे दोन्ही योजनेचे मिळून वर्षाला 12 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेतंर्गत भरपूर शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. खाली देण्यात आलेल्या 14 गोष्टी जर पूर्ण केलेल्या असतील तरच तुमचा हप्ता चालू राहणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना ही नोव्हेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या पात्रतेच्या अटी व शर्ती पीएम किसान योजनेप्रमाणेच आहेत. जे लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया.

अनुदान न मिळण्याचे किंवा हप्ते बंद होण्याचे कारणे व उपाय-

  1. जमिनीचे प्रामाणिकरण नसणे(Land Seeding) – महसूल विभागाची संपर्क करून जमिनीचे Land Seeding करून घ्यावे.
  2.  ई-केवायसी केलेली नसणे- स्वतः सी.एस.सी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ई-केवायसी करून घ्यावी.
  3. बँक खाते आधार लिंक नसणे- बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा जवळच्या पोस्टामध्ये (DBT Enable) खाते उघडावे.
  4. बँक खाते DBT Enable नसणे- बँक खाते आधार लिंक करून घ्यावे किंवा जवळच्या पोस्टात (DBT Enable) खाते उघडावे.
  5. आधार लिंक बँक खाते बंद असणे- बँक खाते सुरू करून घ्यावे.
  6. बँक खात्याला दुसऱ्या कोणाचे आधार लिंक असणे- बँकेत जाऊन दुरुस्ती करून घ्यावी.
  7. नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्तीकरणे- स्वतः किंवा सी.एस.सी केंद्रामार्फत पोर्टलवरती आधार दुरुस्ती करून घ्यावी.
  8. नोंदणी केल्यानंतरच्या काळामध्ये आयकर भरणा करणे- अर्ज अपात्र होतो.
  9. स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे- योजनेत परत लाभ घेता येणार नाही.
  10. विविध कारणास्तव अर्ज अपात्र असणे- आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह तहसील कृषी अधिकारी यांना भेटावे.
  11. लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे- अर्ज अपात्र होतो.
  12. नोंदणीनंतर जमिनीची विक्री केल्याने भूमीहीन होणे- योजनेचा परत लाभ घेता येणार नाही.
  13. बँकेकडून व्यवहार(Transaction Failure) नाकारल्यास- बॅंकेत जाऊन चौकशी करुन अडथळे दूर करावेत.
  14. फार्मर आयडी कार्ड नसल्यास- लाभ मिळणार नाही. 

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *