पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक हे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा अपघात झाल्यास मदतीचा आधार दिला जाणार आहे. त्यासाठी शासनाने “विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2025” ही जाहीर केलेली आहे. यानुसार अपघाताने अथवा दुर्घटनेत एखाद्या भाविकांचा मृत्यू झाला तर वारसांना 4 लाखाची मदत दिली जाणार आहे. तर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात राहिलेल्यांना 16 हजारांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे सहसचिव संजय इंगळे यांनी आदेश जाहीर केलेले आहेत.
काय आहे ही योजना?-
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025” ही जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 16 जून ते 10 जुलै 2025 या काळात अपघात किंवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या वारकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. त्यामध्ये अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच वारी करत असताना वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आले तर 74 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. वारी दरम्यान वारकऱ्यांना 60 टक्क्यांहून जास्त अपंगत्व आलेले असल्यास 2 लाख 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. एक आठवड्यापेक्षा जर जास्त दिवस रुग्णालयात वारकरी राहिला तर 16 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये रुग्णालयात वारकरी दाखला असला तर 5 हजार 400 रुपयांची मदत दिली जाणार आहे.
योजनेच्या आवश्यक बाबी-
- ही योजना आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी, खाजगी व सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू असणार आहे.
- मदतीचा दावा करणाऱ्या वारकरी किंवा त्यांच्या वारसांना जिल्हाधिकाऱ्याकडे यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
- अर्जासोबत संबंधित वारकरी आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथे गेल्याबाबत संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
- सर्व तहसीलदार संबधित वारकरी यात्रेसाठी गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी व त्यांच्या वारसदारांना निर्गमित करणार आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉटअॅप ग्रुप जॉईन करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.