संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले आहेत की नाहीत? ऑनलाईन कसे तपसावे!

आज आपण सदर लेखातून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाची स्टेटस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून कसे पहावे, याची माहिती जाणून घेणार आहोत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील गरजू, अपंग, वृद्ध, अनाथ, विधवा, परित्यक्ता, वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये दरमहा नियमित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. पण हे पैसे आपल्या खात्यात आलेले आहेत की नाहीत? असा अनेक लाभार्थ्यांना हा प्रश्न सत्तावत असतो.  

संजय गांधी निराधार अनुदान योजना-

  • उद्दिष्ट- गरजू व उपेक्षित नागरिकांना दरमहा याद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • लाभार्थी- वृद्ध, विधवा, अनाथ, अपंग, घटस्फोटित महिला, HIV बाधित, गंभीर आजारांनी त्रस्त व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात.
  • अनुदान रक्कम- साधारणत: 1500 प्रतिमह (प्रकारानुसार वेगवेगळे असते)
  • स्वरुप- बॅंक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे स्टेटस पाहण्याची पद्धत-

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी सर्वात अगोदर खाली देण्यात आलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अधिकृत पोर्टल वर जायचे आहे किंवा तुमचा मोबाईल/लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे. sas.mahait.org
  • त्यानंतर “लाभार्थी स्थिती” (SGNAY Beneficiary Status) या पर्यायावरती क्लिक करावे.
  • त्यामध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून “Get Mobile OTP” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल तो OTP रकान्यात टाकायचा आहे.
  • जर OTP येत नसेल तर तुमचे आधार रजिस्ट्रेशन अजून ऑनलाईन झालेले नाही. अशावेळी जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करून घ्यायची आहे.
  • OTP टाकल्यानंतर “Get Data” या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • पुढे यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर पुढील माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. नाव, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे, कोणत्या Financial Year मध्ये अनुदान मिळालेले आहे, कधी व किती रक्कम कोणत्या खात्यात जमा झालेली आहे.

महत्त्वाच्या सूचना-

  • मोबाईलवरती प्रक्रिया करत असताना “Desktop Site” मोडचा वापर करणे आवश्यक आहे.
  • लाभाची स्थिती बघत असताना आधार क्रमांक व मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  • OTP येत नसेल तर आधार अपडेटसाठी अधिकृत केंद्राशी संपर्क साधावा.

योजनेचा लाभ कधी दिला जातो?-

सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा पुढल महिन्याच्या सुरुवातीला अनुदान खात्यात जमा होत असते. कधी कधी प्रशासकीय कारणास्तव उशीर होतो. त्यामुळे वरील पद्धतीने वेळोवेळी स्टेटस तपासत राहणे फायदेशीर ठरणार आहे.

योजनेबाबत संपर्क-

  • या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करावा.
  • त्याचबरोबर तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *