बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी वाटप योजना सुरु!

आज आपण सदर लेखातून बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी वाटप योजना ही राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी लागणारी गरजेची भांडी मोफत देण्यात येते. आता यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. मोफत भांडी योजनेसाठी आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेचा उद्देश-

  • बांधकाम कामगारांच्या गरजा पूर्ण करणे व त्यांना दिलासा देणे.
  • कामाच्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या भांड्यांची सोय करून देणे. कामासाठी फिरताना लागणारी भांडी घेऊन जाण्याचा त्रास यामुळे वाचतो.

सदर योजनेसाठीची पात्रता-

  • बांधकाम कामगार म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  • कामगाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त व साठ वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभार्थीदार लाभ घेत नसावा.

सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-

  • या योजनेचा अर्ज बांधकाम कामगार आपल्या सोयीच्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.
  • अर्ज भरताना नंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना सोयीची तारीख निवडायची आहे.
  • तारीख निवडल्यानंतर कामगाराला मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहेत.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • बँकेचे पासबुक
  • 90 दिवस काम केल्याचा दाखला
  • इतर आवश्यक कागदपत्रे

सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी-

  • सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या mahabocw.in या वेबसाईटला भेट द्यावी.
  • किंवा आपल्या जवळच्या कामगार सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.

वितरण प्रक्रिया व वेळापत्रक-

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 जुलै 2025 पासून राज्यभरात भांडी वाटपाची वास्तविक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष वितरण केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. हे केंद्र अशा ठिकाणी निवडण्यात आलेली आहेत, जेथे कामगारांना सहज पोहोचता येणार आहे व त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.

सदर योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया-

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • त्यानंतर “Profile Login” या पर्यायावरती क्लिक करावे.
  • त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून, आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
  • सर्वात शेवटी अर्ज सबमिट करावा.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *