जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभास पात्र असाल आणि या योजनेमधील तुमचे नाव व आधार कार्डवरील नाव वेगळे असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्मान होऊ शकते. यामुळे तुमचा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अडकू शकतो. जर तुम्हाला ही अडचण असेल तर तुम्ही खालील दिलेले काम लवकरात लवकर करून घ्यावे. पीएफ किसान योजनेचा 20वा हप्ता हा जूनमध्ये येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु आत्तापर्यंत पीएम किसानचा 20वा हप्ता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. त्याचवेळी अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा हप्ता वितरित करण्याची शक्यता आहे.
ही चूक कशी दुरुस्त करावी?-
जर तुमचे पीएम-किसान योजनेतील नाव आधारशी जुळत नसेल तर तुम्हाला हे काम घरी बसल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सहसपणे करता येणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने ही चूक दुरुस्त कशी करावी?-
- सर्व प्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
- त्यातील ‘शेतकरी कॉर्नर’ या पर्यायासमोरील ‘स्वयं-नोंदणीकृत शेतकऱ्याचे अपडेट’ या पर्यायावरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकावा व योग्य पर्याय निवडावा.
- आधारवर दिसत असलेल्या नावासारखे तुमचे नाव जुळवा व त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे.
ऑफलाईन पद्धतीने ही चूक कशी दुरुस्त करावी?-
खालील कागदपत्रे बरोबर घेऊन तुमच्याजवळच्या CSC केंद्रामध्ये किंवा कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जावे. त्यासाठी तुम्हाला तुमच्याबरोबर आधार कार्ड, जमीन नोंदी, बँक पासबुक, पीएम-किसान म्हणजेच (फार्मर आयडी उपलब्ध असल्यास)
अशा पद्धतीने तुम्हाला पीएम किसान योजनेमधील नाव आधार कार्डसारखे करता येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

